इंदू मिलच्या जागेसाठी भीमसैनिकांचे आंदोलन

April 14, 2012 7:37 AM0 commentsViews: 17

14 एप्रिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेसाठी आज रिपब्लिकन सेनेनं इंदू मिलपुढे आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी इंदू मिलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामासाठी आंतराष्ट्रीय टेंडर एमएमआरडीए काढणार आहे. सरकारवर विश्वास आहे यामुळे आजचे आंदोलन मागे घेत असल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आंनदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं.

close