ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचा सत्कार

April 13, 2012 12:40 PM0 commentsViews: 5

13 एप्रिल

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी आणि माजी आमदार दत्ताजी ताम्हाणे यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पर्दापण केल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र विधान मंडळातर्फे त्यांचा आज विधानभवनात खास सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दोन्ही सभागृहाचे आमदार उपस्थित होते. यावेळी दत्ताजी ताम्हाणे यांनी राज्य विधिमंडळातील आपल्या 11 वर्षातील कारकिर्दितील अनेक किस्से सांगितले.

close