हिंगोलीत पिकअप व्हॅन-ट्रकची धडक, 11 जण ठार

April 14, 2012 10:49 AM0 commentsViews: 65

14 एप्रिल

हिगोली जिल्हात वाई फाट्याजवळ झालेल्या पिकअप व्हॅन आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे मृतांची संख्या 11 वर गेली आहे. तर अपघातात 12 जण जखमी झालेत यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. वसमत वाई फाट्‌याजवळ काल रात्री पिक अप व्हॅन आणि ट्रकध्ये समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की पिक अप व्हॅनमधील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी आज वसमत रुग्णालयात 2 तर नांदेड रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. लग्नाची खरेदी करुन वसमतवरुन परत येतांना अपघात झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. ट्रक चालक घटनास्थऴावरुन फरार झाला आहे.

close