नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावाने महिलेवर ऍसिड फेकले

April 13, 2012 12:57 PM0 commentsViews: 1

13 एप्रिल

नाशिकमध्ये आज दुपारी एका महिलेवर ऍसिड फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सुशिला कसबे असं या महिलेचं नाव आहे.. यात ती गंभीर जखमी झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक सुर्यकांत लवटे यांच्या भावाने ऍसिड फेकल्याचा जखमी महिलेच्या कुटुंबीयांनी केला. उपनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ऍसिड फेकणारा विश्वास उर्फ तात्या लवटे फरार आहे. घर बांधण्यावरून तिच्यात आणि लवटेमध्ये वाद झाला होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.

close