निलंबित 14 आमदारांची निलंबन मागे घेण्याची मागणी

April 13, 2012 1:14 PM0 commentsViews: 4

13 एप्रिल

दिवेआगारच्या सुवर्णगणेश मुर्तीचोरी प्रकरणी आंदोलन करणारे शिवसेना-भाजपचे 14 आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. निलंबित आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केलं. तसेच याप्रकरणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी हर्षवर्धन पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निलंबन मागे घेण्याची विनंती केली.

दिवेआगार येथील प्रसिध्द सुवर्णगणेश मुर्ती आणि तीचा मुकुट दरोडेखोरांना चोरी केला. यावेळी दरोडेखोरांना दोन्ही सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण केली यात दोन्ही सुरक्षारक्षकांचा उपचार घेताना काही दिवसांनी मृत्यू झाला. पण इतके दिवस उलटून सुध्दा काही शोध लागत नसल्यामुळे युतीच्या आमदारांनी विधानसभेत या प्रकरणाबद्दल चर्चा करण्याची मागणी केली. विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली.

याच दरम्यान, काही आमदारांनी गणेशाची मुर्तीच सभागृहात आणली आणि महाआरती म्हणायला सुरुवात केली. विधानसभेच्या पायर्‍यावरही जोरदार घोषणाबाजी केली. आमदारांच्या या कृत्याबद्दल 1 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. आता आमदारांनीच या प्रकरणी विरोधकांची आणि मुख्यमंत्र्यांकडे आता निलंबन मागे घेण्यासाठी साकडं घालतं आहे.

close