वर्ध्यात महाप्रसादातून 150 जणांना विषबाधा

April 14, 2012 11:47 AM0 commentsViews: 3

14 एप्रिल

वर्ध्यात महाप्रसादातून विषबाधा झाल्याने 150 हून अधिक जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील आंजी मोठी इथं अनूसया माता मंदिरात वार्षिक उस्तवानिम्मीतानं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. अचानक महाप्रसादात जलेबी आणि बासुंदी देण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर अनेकांना मळमळ आणि उलट्या सुरु झाल्या. त्यामुळे 112 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तर उर्वरीत लोकांना आंजीच्या खाजगी आणि प्राथमिक उपकेंद्रात हलवण्यात आलं. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अद्याप कुणालाही सुट्टी देण्यात आलेली नाही.

close