अधिकार्‍यांचा दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया

April 13, 2012 2:10 PM0 commentsViews: 2

13 एप्रिल

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईमुळे सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. केंद्र आणि राज्य सरकारनंही हे मान्य केलं आहे पण काही ठिकाणी मात्र एमआयडीसी आणि जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जातंय. आणि अधिकार्‍यांचं मात्र याकडे लक्ष नाहीय. बारवी धरणातून मुरबाड एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी सव्वा फूट व्यासाची पाईपलाईन गेल्या दोन आठवड्यांपासून 20 ते 25 ठिकाणी फुटली. पण एमआयडीसीचं मात्र याकडं दुर्लक्ष करत आहे. 10 वर्षापुर्वी टाकलेली ही 16 किलोमीटरची पाईपलाईन आता गंजलीय आणि अनेक ठिकाणी फुटलीय. विशेष म्हणजे बारवी धरणाची पाण्याची पातळी यावर्षी अतिशय कमी झालीय, दुसरीकडे मात्र धरणातीलं लाखो लिटर पाणी गळतीमुळे वाया जातंय.

close