पाच महापालिकांसाठी 15 एप्रिलला मतदान

April 13, 2012 2:44 PM0 commentsViews: 1

13 एप्रिल

पाच महापालिकांसाठी येत्या 15 एप्रिलला मतदान होतं आहे. त्यात लातूर, मालेगाव, भिवंडी-निजामपूर, परभणी, चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे. सर्व 5 महापालिकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. तर महायुती काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळावर लढत आहे. आज या महापालिकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. लातूर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने विलासराव देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर मालेगावमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या कालच्या सभेनंतर मालेगवामध्येही निवडणुकीत रंग भरले गेलेत.

close