नुपूर तलवार यांना कोर्टाचा दिलासा

April 13, 2012 2:52 PM0 commentsViews: 4

13 एप्रिल

आरुशी हत्याकांड प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आरोपी नुपूर तलवार यांना दिलासा दिला. नुपूर तलवार यांना सध्यातरी अटक होणार नाही. नुपूर यांच्या याचिकेवर कोर्टात निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांना अटक करु नये असं कोर्टाने म्हटलं आहे. ट्रायल कोर्टाने नुपूर तलवार यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यांना अटक करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी त्यांच्या घरीही गेले. पण नुपूर घरी नव्हत्या. त्यांनी या वॉरंटला स्थगिती द्यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. सुनावणीला नुपूर स्वत: हजर होत्या. दरम्यान, हा खटला आता सरन्यायाधीशांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

close