हा तर बिन पैशाचा तमाशा – राऊत

April 13, 2012 3:26 PM0 commentsViews: 4

13 एप्रिल

आज मनसेचा बिहार दिनाच्या कार्यक्रमाला असलेला विरोध मावळलाय. अगोदर विरोध करायचा मग त्याला पाठिंबा द्याचा हे जे दोन दिवसात घडले आहे. हे तर मनसेचं फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. राजकीय फायद्यासाठीच हा वाद केला गेला आहे जे काही घडले हा तर बिन पैशाचा तमाशा असल्याची कडवट टीकाही संजय राऊत यांनी केली. गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बिहार दिन साजरा करुन दाखवाच असं थेट आव्हान दिलं होतं. मात्र आज सांस्कृतिक कार्यक्रमांना आपला विरोध नाही असं सांगत बिहार दिनाच्या मुद्यावरुन त्यांनीच रान पेटवलं आणि पेटणार्‍या वणव्यावर खुद्द राज ठाकरेंनीच पाणी टाकून त्याला शांत केलं. राज यांच्या माघाराचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरपुस समाचार घेतला. जो दोन दिवसांपासून वाद सुरु होता याला फिक्सिंग असंच म्हणता येईल. देवेश ठाकूर आमच्याकडेही आले होते . त्यांनी याबद्दल हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे असं सांगितलं. त्यानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सगळ्या पक्षांना काय भूमिका घ्याची आहे ती घेऊ द्या त्यानंतर ठरवू असे जाहीर केलं होतं. दिल्लीतही बिहार मधील अनेक खासदार याबद्दल माझ्या संपर्कात होते पण राज ठाकरे यांनी काही माहिती करुन न घेताच हल्ला चढवला. दोन दिवस जो सगळा वाद चालला हा तर बिन पैशांच्या तमाशा होता अशी टीका राऊत यांनी केली.

close