दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

April 14, 2012 5:35 PM0 commentsViews: 28

14 एप्रिल

22 व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा गानसम्राक्षज्ञी लता मंगेशकर यांनी मुंबईत केली. तबलावादक कुमार बोस यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेत विक्रम गोखले आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर नाट्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी डॉ.वसंतराव देशपांडे या नाट्यसंस्थेला मोहन वाघ नाट्य पुरस्कार जाहीर झाला. 24 एप्रिलला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

close