टाटांची इंग्लंड सरकारकडे कर्जाची मागणी

November 24, 2008 4:06 AM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबरआर्थिक मंदीच्या तडाख्यातून टाटा देखील सुटलेली नाही. टाटांनी 'जॅग्वार लॅन्ड रोव्हर्स' या कंपनीकरता एक कोटी पॉऊंडच कर्ज मिळवण्यासाठी ब्रिटिश रकारसोबत चर्चा केल्याचं समजतंय. द संडे टाईम्स या ब्रिटीश वृत्तपत्रात ही बातमी प्रकाशित झाली आहे. पंतप्रधान गॉर्डन ब्रॉउन हे या प्रस्तावावर विचार करत आहेत. ते मंगळवारपर्यंत या संदर्भात निर्णय कळवण्याची शक्यता आहे. या कर्जामुळं पुढच्या 24 महिन्यात कंपनीची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी मदत होणार आहे. सध्याच्या आर्थिक मंदीमुळं कार उत्पादक कंपन्यापुढं अर्थपुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सात महिन्यापुर्वीच, टाटानं ही कंपनी ताब्यात घेतली होती.

close