किल्लारीला 8 दिवसानंतर पाणी पुरवठा

April 15, 2012 10:19 AM0 commentsViews: 1

15 एप्रिल

भुकंपातून सावरलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या गावकर्‍यांना 19 वर्षानंतरही पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. जीवन प्राधिकरणाकडून 1995 मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून अजुनही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे किल्लारीच्या गावकर्‍यांना आठ दिवसातून एकदा पाणी मिळतंय. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर किल्लारीची समस्या मात्र अधिकच गंभीर आहे. भुकंपानंतर मदत मिळाली अनेक योजना सुरू झाल्या मात्र पाणीटंचाई काही दूर झाली नाही. दिवसातून किमान एक-दोन टँकरने प्रशासनाने पाणी पुरवठा करावा अशी आर्त मागणी किल्लारीकरांनी केली आहे.

close