उस्मानाबादमध्ये पाणीटंचाईचे तीव्र संकट

April 15, 2012 10:22 AM0 commentsViews:

15 एप्रिल

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललं आहे. जिल्ह्याला आता नैसर्गिक पाणीटंचाईसोबतच कृत्रिम पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं आहे. तुळजापूर तालुक्यातील ताड इप्परगा येथील इथल्या गावकर्‍यांना गावात जलस्वराज्य आणि ग्रामीण पाणीपुरवठा सारख्या योजना राबवून देखील 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी कोसो मिल भटकंती करावी लागतेय. गावात जलस्वराज्यची 22 लाख रूपयांची योजना राबवली मात्र त्यात भ्रष्टाचार झाल्याने गावकर्‍यांना पाणीच मिळत नाही. शिवाय यात भ्रष्टाचार्‍यांकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिल्यानंतरही त्यांच्यावर आतापर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. याचा फटका मात्र गावकर्‍यांना बसतोय.

close