कॅगचा अहवाल उद्या विधानसभेत सादर होणार

April 16, 2012 10:44 AM0 commentsViews: 1

16 एप्रिल

कॅगचा अहवाल फुटल्यामुळे राज्याला मोठा हादरा बसला होता. अखेर हा अहवाल आता उद्या विधानसभेत मांडला जाणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे हा अहवाल आज सभागृहात मांडता येणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. त्यावर विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकुब करण्यात आलं. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल काही दिवसांपूर्वी लिक केला होता. त्यात 10 मंत्र्यांवर जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत ठपका ठेवण्यात आला. या अहवालावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.