लातूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

April 15, 2012 11:31 AM0 commentsViews: 1

15 एप्रिल

लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातल्या मोतीनगर भागामध्ये रात्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम हाणामारी झाली. रात्री उशिरा पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. रात्री उशीरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

close