देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सर्व मुख्यमंत्र्यांची परिषद

April 16, 2012 12:11 PM0 commentsViews: 5

16 एप्रिल

दिल्लीमध्ये अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद सुरू आहे. देशाच्या सुरक्षेसाठी राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलं. पण अनेक मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. दहशातवादाविरोधात लढण्यासाठी मोक्काप्रमाणेच असलेल्या इतर विधेयकांबाबत विचार करावा असं मत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी माओवाद्यांनी अपहरण केलेल्या आमदाराला सोडवण्यासाठी केंद्राकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. जम्मू- काश्मीरमधून लष्कराचा विशेषाधिकार कायदा अंशतः काढून घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या परिषदेत भाग घेतला नाही. 5 मे रोजी एनसीटीबाबत होणार्‍या बैठकीत त्या भाग घेणार असल्याचं समजतंय.

close