पाच पालिकांसाठी आज फैसला जनतेचा

April 16, 2012 3:02 AM0 commentsViews: 3

16 एप्रिल

भिवंडी-निजामपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी आणि मालेगाव या पाच महापालिकेसाठी आज मतमोजणी होत आहे. या महापालिकांसाठी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाच महापालिकांसाठी काल सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. भिवंडी निजामपूर महापालिकेत शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे, राष्ट्रवादीचे मुनाफ हकीम, माणिकराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर लातूर महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करुन प्रतिष्ठेची केली.

सर्व विरोधकांनी मिळून देशमुखांच्या गढीसमोर आव्हान उभं केलंय. परभणी महापालिके मध्ये एकूण 65 जागांसाठी मतमोजणी होतेय. एकूण 420 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार संजय जाधव, काँग्रेसचे आमदार सुरेश देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. चंद्रपूर महापालिके त 66 जागांसाठी एकूण 458 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, भाजप, प्रहार, युवाशक्ती हे प्रमुख पक्ष लढतीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया, पालकमंत्री संजय देवतळे, भाजपचे खासदार हंसराज अहिर, आमदार नाना शाम्कुले, भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लातुर महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. लातुर नगरपरिषदेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे.लातूर महापालिकाएकूण जागा – 70 प्रभाग – 35एकूण उमेदवार – 418प्रमुख पक्ष – काँग्रेस, राष्ट्रवादी, महायुती, मनसे प्रतिष्ठा पणाला – विलासराव देशमुख, राणा जगजित सिंग

close