बिहारमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करा – नितीश कुमार

April 16, 2012 4:13 AM0 commentsViews: 2

16 एप्रिल

मुंबईत बहुचर्चित बिहार दिन काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. या संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्राचा जयजयकार झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मराठी भूमीला वंदन करत मराठीत भाषणाला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचे आभार मानले. एवढंच नाही तर नितीशकुमारांनी मराठी जनतेला बिहारमध्ये येण्याचं निमंत्रणही दिलंय. त्याचबरोबर बिहारमध्ये येऊन महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा असं आवाहनही नितीश कुमारांनी मराठी जनतेला केलं.

close