चंद्रपूरमध्ये काँग्रेस ठरला मोठा पक्ष

April 16, 2012 8:39 AM0 commentsViews: 4

16 एप्रिल

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला सर्वात जास्त 21 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला फक्त 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. चंद्रपूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभाग क्रमांक 25 बाजार वार्ड मधून भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळवता आली असून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक जैस्वाल यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे करिम लाला काझी यांनी जेस्वाल यांचा पराभव केला आहे. तर शिवसेनेला सहा ठिकाणी यश आले आहे.

close