सुभाष घईंनी घेतली राज यांची भेट

April 17, 2012 5:08 PM0 commentsViews: 3

17 एप्रिल

व्हिसलिंग वुड्स प्रकरणी सिने दिग्दर्शक सुभाष घई यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. व्हिसलिंग वुड्सच्या जमिनीच्या वादावरुन सुभाष घई सध्या वादात सापडलेत. त्याबाबतच आज सुभाष घईंनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली. मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांनी सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड्स या संस्थेला 20 एकर जमीन निविदा न मागवताच दिली होती. 32 कोटींची ही जमीन केवळ 3 कोटी रुपयात देण्यात आली होती. संस्थेला दिलेली 20 एकर जमीन परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.2000 साली ही सरकारी जमीन कमी किमतीत घईंना देण्यात आली होती. नाना पटोले यांच्या समितीने कडक शब्दात या व्यवहारावर ताशेरे ओढले होते आणि कारवाईची शिफारस केली होती. पण कारवाई न झाल्याने प्रकाश पाठक यांनी कोर्टात याचिका दाखल केली. 2000 साली या जमिनीची किंमत होती 32 कोटी…पण मुक्ता आर्ट्सला ही जमीन मिळाली फक्त 3 कोटींमध्ये. विशेष म्हणजे ही जागा मंजूर करण्यापूर्वी सरकारने निविदाही मागवल्या नव्हत्या. यावर कॅगने ताशेरेही ओढले होते. आता संपूर्ण जागेपैकी तीन एकर जागेवर घई यांनी बांधकाम केले आहे. आज राज यांच्या भेटीने 'टिवस्ट' निर्माण होतो का हे पाहण्याचे ठरेल.

close