भिवंडीत पराभूत नगरसेवकांच्या समर्थकांचा गोंधळ

April 16, 2012 8:51 AM0 commentsViews: 2

16 एप्रिल

भिवंडीच्या कामतघर इथं राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.भिवंडीच्या कामतघर इथं वॉर्ड क्र. 26 ब मधील सुरेश पाटील यांना शिवसेनेच्या नित्यानंद नाडर यांनी पराभूत केलं. आपल्या नगरसेवकाचा पराभव पाहून समर्थकांनी एकच गोंधळ घातला.जमावाला आवर घालण्यासाठी सीआरपीएफ (SRPF) च्या दलाने घटनास्थळाचा ताबा घेतला. पण ऐकणार ते कार्यकर्ते कोणते ? अखेर सीआरपीएफच्या जवानांना लाठीमार करावा लागला. सध्या भिवंडीत वातावरण निवळले असले तरी तणाव कायम आहे.

close