अपहृत जहाजावरचे कर्मचारी मुंबईत परतले

November 24, 2008 4:57 AM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर, मुंबईजहाजातील अठरा भारतीय कर्मचार्‍यांपैकी चौघं आज पहाटे मुंबईत परतले. हे चौघंही मस्कतहून मुंबईत आले. पंधरा सप्टेंबरला 'स्टॉल्ट व्हेलर' या जहाजाचं चाच्यांनी अपहरण केलं होतं. त्यानंतर या सगळ्यांची सोळा नोव्हेंबरला सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर या सगळ्यांना मस्कतला नेऊन तिथं त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. आता उर्वरित चौदा भारतीय कर्मचारी आठवडाभरात भारतात परतणार आहेत.

close