होम, कार लोन स्वस्त होणार

April 17, 2012 10:21 AM0 commentsViews: 3

17 एप्रिल

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज चालू वर्षात रेपो रेट कमी केले आहेत. आरबीआयने देशाच्या विकासाला हातभार लावत 8.5 टक्क्यांवरुन 8 टक्के करण्यात आले आहे. यामुळे होमलोन आणि कारलोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनं 3 वर्षात पहिल्यांदा रेपो रेट कमी केले आह.आज आरबीआयची क्रेडिट पॉलिसी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये 0.50 टक्क्यांनी रेपो रेट कमी केले. 8.5 टक्क्यांवरुन आता रेपो रेट 8 टक्क्यांवर करण्यात आले पण सीआरआर मध्ये काही बदल केले नाही. महागाईच्या दरात मार्च महिन्यात 6.89 टक्के आकडा गाठला. जो फेब्रुवारी महिन्याच 6.95 टक्के होता.

गृहकर्जदारांना दिलासा

1) कर्ज : 20 लाखमुदत : 15 वर्षबचत : 614 रु/महिना2) कर्ज : 20 लाखमुदत : 20 वर्षबचत : 664 रु/महिना3) कर्ज : 30 लाखमुदत : 30 वर्षबचत : 898रु/महिना

close