मालेगाव महापालिकेची वाटचाल त्रिशंकूकडे

April 16, 2012 9:59 AM0 commentsViews:

16 एप्रिल

पहिल्या महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार्‍या मालेगाव महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. एकूण 80 जागांसाठी आतापर्यंत 78 जागांचे निकाल जाहीर झाले आहे. 25 जागा जिंकत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहे .तर 17 जागा जिंकत तिसरा महाज कमी जागा मिळवत दुसर्‍या क्रमांकावर आहे. शिवसेना 11 जागा मिळवत चांगले यश मिळाले आहे. मालेगाव विकास आघाडीला 4 जागांवर विजय मिळालाय. तर अपक्षांना तीन जागा आणि मालेगाव जनराज्य पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

मालेगाव महापालिकेचा रणसंग्राम

काँग्रेस – 25तिसरा महाज -17शिवसेना 11राष्ट्रवादी – 8जनता दल – 4मनसे – 2इतर – 9

close