केंद्रीय समितीची दुष्काळग्रस्त भागांना भेटी

April 17, 2012 10:46 AM0 commentsViews:

17 एप्रिल

राज्यात दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करत आहे. आज केंद्रीय दोन सदस्यीय समिती राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहे. काल या समितीने सातारा जिल्ह्यातल्या माण, खटाव आणि फलटणमधल्या काही भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी गावकर्‍यांशीही चर्चा केली. दुष्काळामुळे कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागतंय याबाबत माहिती घेतली. या भागातली परिस्थिती गंभीर असल्याचं यावेळी समितीनं मान्य केलं.

close