मुंबई-आग्रा हायवेवर स्वाभिमानी संघटनेचा रास्ता रोको

April 17, 2012 10:57 AM0 commentsViews: 2

17 एप्रिल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई – आग्रा हायवेवर रास्ता रोको आंदोलन केलं जातंय. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतं आहे. मालेगाव जवळच्या टेहरे गावात हे आंदोलन आयोजित करण्यात येतंय. 20 दिवसांपुर्वी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनावेळी राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याने हे आंदोलन करत असल्याच शेतकरी संघटनेनं सांगितले. नोव्हेंबर ते मार्च पर्यंत कांद्याच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसानभरपाई द्यावी, किमान निर्यातमुल्य शुन्य करावे, राज्य सरकराने 895 रुपये क्विंटल या दराने खरेदी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली. कांदा विकास निधी उभारावे, कांद्यासाठी निर्यात अनुदान देण्याची मागणी आजच्या आंदोलनात करण्यात आली. दरम्यान ,आंदोलनाआधी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरवात केली आहे.

close