‘आदर्श’च्या चौकशीवर परिणाम होणार नाही:सीबीआय

April 17, 2012 12:03 PM0 commentsViews: 1

17 एप्रिल

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन आयोगाच्या अहवालाचा सीबीआय चौकशीवर कोणताही परिणाम होणार नाही. आदर्शची मालकी राज्य सरकारची आहे की लष्कराची याचा सीबीआयच्या केसवर परिणाम नाही असं सीबीआयने स्पष्ट केलं. भ्रष्टाचार, जागेचा दुरूपयोग, नियमांचं उल्लंघन, गुन्हेगारी कट, खोटी कागदपत्र तयार करणं या मुद्यावर सीबीआय चौकशी करणार आहे. आयोग हे फक्त राज्य सरकारला माहिती देवू शकतात. हे टी.टी. अँथोनी विरूध्द केरळ सरकार प्रकरणात सिध्द झालं आहे असं सीबीआयने स्पष्ट केलं. आदर्श प्रकरणी आज न्यायालयीन आयोगाचा अंतरीम अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. आदर्शची जमीन राज्य सरकारच्या मालकीची असल्याचा निर्वाळा या अहवालात देण्यात आला. तसेच आदर्शची जमीन ही कारगील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी राखीव नव्हती असाही निष्कर्ष या अहवालात दिला गेला आहे.

दरम्यान, आदर्श प्रकरणात दुष्प्रचार झाल्यानं आमची नाहक बदनामी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर विरोधकांनी मात्र सरकारवर जोरदार टीका केली.

close