औरंगाबादमध्ये महिलेची जाळून हत्या

April 18, 2012 12:57 PM0 commentsViews: 3

18 एप्रिल

औरंगाबादमध्ये 47 वर्षाच्या एका महिलेची जाळून हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातल्या उल्कानगरी भागात श्रुती विजय भागवत राहत होत्या. त्यांचे पती दुबईला नोकरीला आहेत, तर मुलगा पुण्यात शिकतोय. आज सकाळी त्यांच्या घरात गादी जळाल्याचे आणि दार उघडंच असल्याचं शेजार्‍यांना दिसलं. पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा त्यांना श्रुती यांची गादीखाली जाळून हत्या केल्याचं दिसलं. घरातलं सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलं होतं. पण घरातून काही ऐवज लुटलाय का ? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हत्येच्या कारणांचा पोलीस तपास करत आहे.

close