राजस्थानचा डेक्कनवर ‘रॉयल’ विजय

April 17, 2012 1:57 PM0 commentsViews: 1

17 एप्रिल

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्सने डेक्कनवर 5 विकेटने मात केली. पहिली बॅटिंग करणार्‍या डेक्कन चार्जर्सने राजस्थानसमोर विजयासाठी 197 रन्सचं टार्गेट ठेवलंय. डेक्कनचे बॅट्समन आज चांगलेच चार्ज झाले होते. शिखर धवन, जेपी ड्युमिनी आणि डॅनिअल ख्रिस्टिअनने हाफसेंच्युरी ठोकली. पण याला राजस्थाननंही अगदी चोख उत्तर दिलंय. राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे या ओपनिंग जोडीने सुरुवातीपासून फटकेबाजी करत अवघ्या 5 ओव्हरमध्ये 62 रन्सची पार्टनरशिप केली. द्रविड 42 तर रहाणे 44 रन्सवर आऊट झाला. पण यानंतर आलेल्या ब्रॅड हॉगने तुफान फटकेबाजी करत आव्हान कायम ठेवलं. हॉगने डेल स्टेनच्या एकाच ओव्हरमध्ये सलग चार फोर मारले.

close