महाराष्ट्र दिनापासून अण्णांचा राज्यव्यापी दौरा

April 18, 2012 1:08 PM0 commentsViews:

18 एप्रिल

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौर्‍याची सुरुवात शिर्डीपासून करणार आहेत. राज्यात सक्षम लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी अण्णंाचा हा दौरा असणार आहे. या दौर्‍याआधी म्हणजे 30 एप्रिलला अण्णा, योगगुरू बाबा रामदेव यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर 2 मे रोजी श्री श्री रविशंकर यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. मागिल वर्षी कर्नाटकमध्ये लोकायुक्तांच्या अहवालामुळे माजी मुख्यमंत्री येडियुरुप्पा यांना पायउतार व्हावे लागले होते. कर्नाटकच्या धरतीवर राज्यात लोकायुक्त नेमणूक करावा अशी मागणी अण्णांनी केली आहे. तसेच अण्णांनी जन लोकपाल विधेयकात प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमणूक करा अशी प्रमुख मागणी केली आहे. आता लोकपाल विधेयकावर सरकारची हालचाल ठप्प झाली. अण्णांनी लोकपालसाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे मागिल महिन्यात दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात स्पष्ट केलं आहे. आता अण्णांनी राज्यात आपला मोर्चा वळवल्यामुळे राज्य सरकार कसा प्रतिसाद देते हे पाहण्याचे ठरेल.

close