ढिगार्‍याखालून 48 तासांनंतर त्याची सुखरूप सुटका

April 18, 2012 2:50 PM0 commentsViews: 1

18 एप्रिल

पंजाबमधल्या जालंधरमध्ये इमारतीच्या ढिगार्‍याखालून तब्बल 48 तासांनी एका व्यक्तीची सुखरूप सुटका झाली. आपल्या 4 सहकार्‍यांचा ढिगार्‍याखाली अडकून मृत्यू होताना पाहिल्याचं त्यानं सांगितलं. रविवारी रात्री ही चार मजली इमारत कोसळली होती. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 58 लोकांना ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आलंय. 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचं प्रशासनानं सांगितलंय.

close