मद्यधुंद तरुणांनी केली एटीएमची तोडफोड

April 17, 2012 3:35 PM0 commentsViews: 3

17 एप्रिल

एटीएममधून पैसे निघत नाही म्हणून तीन एटीएमचीच तोडफोड करण्याचा महापराक्रम कॉलेजमध्ये शिकणारर्‍या विद्यार्थ्यांनी केल्याचं उघड झालं आहे. पुण्यात हडसपर भागात काल उशीरा रात्री हा प्रकार घडला होता. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. ही सर्व मुलं पुण्याच्या मेट्रो पॉलीटनं इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या तिसर्‍या वर्षात शिकणारे विद्यार्थी आहे. मद्यधुंद होवून हे तिघेजण सोलापूर रोडवरील एटीएममध्ये पैसै काढायला गेली होती. मात्र एटीएममधून पैसै न निघाल्याने संतापून या तिघांनी याच रोडवरील युनियन बँक आणि मांजरी रोड वरील एक्सीस बँक आणि आय सी सी आय बँकच्या एटीएमची नासधूस केली आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्नही केला. या तिनही युवकांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पंकज डोले, संदेश राठोड आणि नकूल लोणकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावं आहेत.

close