चित्रा साळुंखेंना नुकसान भरपाई देण्याचा कोर्टाचा आदेश

April 17, 2012 4:25 PM0 commentsViews: 14

17 एप्रिल

आयपीएस अधिकारी के. एल. बिश्नोई प्रकरणी चित्रा साळुंखे यांच्या तक्रारीची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. आणि 14 दिवसात 50 हजार नुकसान भरपाई चित्रा साळुंखेंना देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. याबाबत सरकारची फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली. 2005 मध्ये एलएलबीच्या परीक्षेला गैरहजर असलेले के. एल. बिष्णोई हे चांगल्या मार्कांनी पास झाले होते. सिद्धार्थ विधी महाविद्यालयात प्रोफेसर असलेल्या चित्रा साळुंखे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. आणि त्यांनी यावर आवाज उठवल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत 11 आयपीएस अधिकार्‍यांनी मानसिक छळ केल्याची तक्रार साळुंखे यांनी हायकोर्टात केली होती.

close