स्यू की यांचे 24 वर्षांनंतर देशाबाहेर पाऊल

April 18, 2012 3:01 PM0 commentsViews: 5

18 एप्रिल

म्यानमारमधल्या लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की तब्बल 24 वर्षांनंतर देशाबाहेर जाणार आहेत. जूनमध्ये त्या म्यानमारबाहेर जाणार आहेत. पण, या लोकशाहीवादी नेत्या आपली पहिली भेट भारत किंवा चीनला देणार नाहीत. तर त्या नॉर्वेची राजधानी ओस्लोला जाणार आहेत. नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री आणि स्यू की यांच्या एनएलडी पक्षानं या दौर्‍याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 1991 मध्ये स्यू की यांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना नॉर्वेला जाता आलं नव्हतं.

close