करण कक्कड अपहरण प्रकरणात वापरलेली कार सापडली

April 17, 2012 2:04 PM0 commentsViews: 2

17 एप्रिल

करण कक्कड अपहरण प्रकरणात वापरलेली बीएमडब्ल्यू कार आज पुण्यात सापडली. करण कक्कड या मुंबईतील मॉडेलचा अपहरण करुन खून झाल्याचं निष्पण झालंय. मुंबईतल्या अंंबोली पोलीस स्टेशनला कक्कड अपहरण संर्दभात गुन्हा दाखल आहे. करणच्या अपहऱण आणि खून प्रकरणात सध्या मॉडेल सिमरण सूद आणि विजय बंलाडे या दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. बीएमडब्लूमध्ये जात असताना करणचं अपहरण झालं होत या नंतर आरोपीनी त्याची कार पुण्यातील कोंडवा परिसरातील कृष्ण केवल हाऊसिंग सोसायटीमध्ये पार्क करुन ठेवली होती. कार सापडल्याने या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मदत होणार आहे.

close