सीडी प्रकरणामुळे सिंघवी माध्यमांपासून चार हात दूर

April 18, 2012 4:48 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पक्षाच्या पत्रकार परिषदेपासून सध्या बाजूला राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका वादग्रस्त सीडी प्रकरणात अडकल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. पण, आपली तब्येत बरी नसल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्या सीडी प्रकरणी कोणत्याही प्रश्नांना सामोरं जावं लागू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सिंघवींनी कोर्टात धाव घेऊन ही सीडी प्रसारित केली जाऊ नये असा आदेश मिळवला आहे. या सीडी प्रकरणात आपणच असल्याचा दावा सिंघवी यांच्या ड्रायव्हरनं केला आहे.

close