भ्रष्टाचाराच्या मुद्यावर ‘टाईम आऊट’

April 19, 2012 5:43 PM0 commentsViews: 2

19 एप्रिल

विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या संपतंय.पण भ्रष्टाचाराच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरची चर्चा आज अगदी शेवटच्या क्षणी झाली. ही चर्चा समाधानकारक झाली नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय. पण याच विरोधकांनी या अधिवेशनात भ्रष्टाचाराचा मुद्दा ठामपणे उचलून धरला नाही. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला.

कृपाशंकर सिंह यांचं बेहिशेबी मालमत्ता प्रकरण…कॅगच्या अहवालात मंत्र्यांच्या ट्रस्टवर ताशेरे आणि आदर्शचा वादग्रस्त अहवाल…

भ्रष्टाचाराचे असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती असतानाही विरोधक निष्प्रभ ठरले. कृपा प्रकरणावर अधिवेशनभर गप्प बसणार्‍या विरोधकांना अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी या मुद्द्याची आठवण झाली. पण एखाद दुसर्‍या भाषणाचा अपपवाद वगळता कृपांच्या प्रकरणाचा उल्लेख बहुतेक नेत्यांनी टाळला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडायला विरोधकांना यश आलं नाही.. भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना अनेकदा सत्ताधारी बाकावरून हरकती घेतल्या गेल्या. त्यामुळे ही चर्चा तांत्रिक मुद्द्यात अडकली.

चर्चा सुरू असताना सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधी बाकावरसुद्धा तुरळक उपस्थिती होती. शिवाय विरोधी पक्षांमध्येच समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची औपचारिकता पार पाडण्या पलिकडे अधिवेशनात काहीच झालं नाही.

close