विधानभवनासमोर शेतकर्‍यांनी कांदे फेकले,दूध ओतले

April 18, 2012 10:29 AM0 commentsViews: 2

18 एप्रिल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानभवन परिसरात आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकर्‍यांनी विधानभवनासमोरच कांदे, बेदाणे फेकले आणि दूध ओतून आपला संताप व्यक्त केला. खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. कांदा आणि दुधाला दरवाढ द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. याआंदोलनामुळे राजू शेट्टींसह 50 आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.

काल मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई – आग्रा हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले याप्रकरणी राजू शेट्टींसह शेतकर्‍यांना अटक करुन सोडून देण्यात आले होते. 20 दिवसांपुर्वी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनावेळी राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याने शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. नोव्हेंबर ते मार्च पर्यंत कांद्याच्या झालेल्या नुकसानीसाठी नुकसानभरपाई द्यावी, किमान निर्यातमुल्य शुन्य करावे, राज्य सरकराने 895 रुपये क्विंटल या दराने खरेदी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं वारंवार केल्या आहे. तसेच कांदा विकास निधी उभारावे, कांद्यासाठी निर्यात अनुदान देण्याची मागणी आजच्या आंदोलनात करण्यात आली. मात्र सरकारने कोणतीच दखल घेत नसल्यामुळे आज राजू शेट्टी यांच्यासह आंदोलक विधानभवनावर परिसरात दाखल झाले. आपल्या मागण्या करा घोषणा देत विधानभवनासमोर कार्यकर्त्यांनी कांदे, बेदाणे फेकले आणि दूध ओतले. यामुळेच एकच गोंधळ उडाला. विधानभवनासमोर कांद्या सडा पडला, दूधाने परिसर न्हाहुन निघाला. झालेला प्रकार पाहुन पोलिसांनी ताबडतोब राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह सर्व शेतकर्‍यांना ताब्यात घेतले.

close