पाणीपुरवढा करणार्‍या टँकर मोजणीत गळती

April 19, 2012 10:05 AM0 commentsViews:

19 एप्रिल

पाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या पुणेकरांना पुणे महापालिका वारंवार पाणी बचतीचे सल्ले देत आहे. पण स्वतः मात्र त्याचं पालन करताना दिसताना दिसत नाही. हे स्पष्ट झालंय सजग नागरिक मंचाच्या एका शोध मोहीमेमुळे.पुण्यामध्ये अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण हे टँकर जिथे भरले जातात तिथे या टँकरची नीट मोजणीच होत नाही. सजग नागरिक मंचाच्या वतीने एका दिवसामध्ये किती टँकर भरले जातात याची मोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण 34 टँकर भरले गेले असल्याचं स्पष्ट झालं. पण या ठिकाणी असलेल्या वहीमध्ये मात्र फक्त 28 टँकरचीच नोंद झाली होती. उरलेले 8 टँकर गेले तरी कुठे याची काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती. पुण्यामध्ये अशी एकूण 20 केंद्र आहेत. प्रत्येक ठिकाणी जर अशीच पाण्याची चोरी होत असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकरांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी तातडीने वॉटर मीटर बसवण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

close