नांदेडमध्ये छत कोसळून दोन पोलिसांचा मृत्यू

April 19, 2012 1:00 PM0 commentsViews: 2

19 एप्रिल

नांदेडमध्ये पोलीस ट्रेनिंग कॅम्पमधील छत कोसळून झालेल्या अपघातात दोन पोलीस जवान ठार झाले आहेत. पोलीस ट्रेनिंग कँम्पच्या छताचे काम सुरु असताना ही घटना घडली. या ढिगार्‍याखाली 13 पोलीस जवान गाडले गेले आहेत. यापैकी 6 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलंय. हे सर्व जवान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ढिगार्‍याखालून जखमींना बाहेर काढण्याच काम युध्दपातळीवर सुरु आहे. या कामी जेसीबी मशीन आणि शेकडो पोलीस जवान काम करत आहे. महत्वाचं म्हणजे या पोलिसांना छत टाकण्याच्या कामात जुंपण्यात आलं होतं.

close