अंधेरीत मित्रांनीच केली मित्राची हत्या

April 19, 2012 1:08 PM0 commentsViews: 3

19 एप्रिल

मुंबईतील अंधेरीमध्ये एका अकरावीच्या मुलाला त्याच्याच वर्गातील मित्रांनी बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. अंश अग्रवाल असं या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्याच वर्गातील 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अंशच्या मैत्रिणीला या मुलांनी अश्लील एसएमएस (SMS) पाठवला होता. त्याला अंशने आक्षेप घेतल्यानंतर या 8 जणांनी अंशला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मागिल महिन्यातच पुण्यामध्ये 50 हजारांच्या खंडणीसाठी शुभम शिर्के या अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्रानी अपहरण करुन हत्या केली. शुभमची हत्या क्राईम सिरिअल पाहुन झाल्याची तपासातून पुढे आले होते. आता मुंबईत पुन्हा एकदा 11 वीत शिकणार्‍या अंश अग्रवालची त्याच आठ मित्रांनी हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

close