गिरणी कामगारांना साडे सात लाखांना घरं

April 20, 2012 12:01 PM0 commentsViews: 4

20 एप्रिल

गेल्या तीसवर्षापासून हक्काच्या घरासाठी लढा देणार्‍या गिरणी कामगारांना आज राज्य सरकारने दिलासा दिला आहे. गिरणी कामगारांसाठी घराच्या किंमतीमध्ये 10 टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना देण्यात येणारी आठ लाख किमतीची घरं आता साडे सात लाखांना मिळणार आहे. आज राज्य अर्थसकल्पीय अधिवेशनाची सांगता होतं आहे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. येत्या मे महिन्याच्या अखेरीला लॉटरी पध्दतीने या घरांची सोडत निघणार आहे. मात्र 10 टक्क्यांची सवलत गिरणी कामगारांना कितपत योग्य ठरणार आहे हे लवकरच गिरणी कामगार संघटना स्पष्ट करणार आहे.

close