नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

April 19, 2012 1:55 PM0 commentsViews: 6

19 एप्रिल

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्यात एक पोलीस जवानाचा मृत्यू झाला. धानोर्‍याजवळच्या गट्टा जवळ ही घटना घडली. गट्टाजवळ सीआरपीएफ (CRPF) च्या मदत केंद्रातील एका जवानाची प्रकृती बिघडली. त्याला गट्टा इथल्या प्राथमिक रुग्णालयात घेवून जात असताना त्यातील एक जवान काही खरेदीसाठी एका दुकानात गेला. त्यावेळी साध्या कपड्यात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांने या जवानावर गोळ्या घातल्या. या घटनेत जखमी झालेल्या अनुभव पांडे या जवानाला गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला.

close