कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

April 19, 2012 2:17 PM0 commentsViews: 16

19 एप्रिल

घरकाम करण्यार्‍या महिलेला लग्नाचे आमिष देऊन गेल्या दहा वर्षापासून शारिरीक संबंध ठेवणारे यवतमाळ येथील कामगार न्यायालयाचे न्यायाधीश अतिक मोहम्मद खान यांच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरुध्द पुण्यातल्या त्यांच्या मोलकरणीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर वडगाव पोलिसांनी आज न्यायाधीशावर गुन्हा दाखल केला.न्यायाधीश अतिक शेख यांच्या पुण्यातील घरी ही विधवा महिला घरकामाला होती. या महिलेला दोन अपत्ये आहे. तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन देऊन न्या. अतिक खान सोबतच वागवत होते. हा प्रकार गेली 10 वर्ष सुरु होता. अतिक खान यांची यवतमाळला बदली झाल्यानंतरही ही महिला त्यांच्यासोबत असतं. या महिलेनं लग्नाची मागणी घातली असता अतिक खान यांनी टाळाटाळ केली आणि तिला घरात कोंडून ठेवून जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार या महिलेनं केली. अखेर या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मुंबई कामगार न्यायालयाचे अध्यक्ष आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाकंडे पाठवण्यात आला आहे. न्यायाधीश अतीक खान यांच्यावर आजच बलात्कार आणि ऍट्रासिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close