दापोलीत प्लास्टिकमुक्तीची मोहिम फत्ते

April 20, 2012 2:23 PM0 commentsViews:

20 एप्रिल

प्लास्टिकमुक्तीच्या घोषणा सर्वच स्तरावर केल्या जातात. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. याला अपवाद ठरलय दापोली शहर. दापोली नगरपंचयतीने गेल्या दीड वर्षापासून हाती घेतलेल्या प्लास्टिक मुक्तीच्या मोहिमेमुळे प्लास्टिक कॅरी बॅग दापोलीतून हद्दपार झालीय. याचीच दखल पर्यावरण मंत्रालयाने घेऊन राज्यातल्या सर्व नगरपालिकांना दापोलीप्रमाणे प्लास्टिक मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. दापोलीत व्यापार्‍यांकडून कुणालाही प्लास्टिक कॅरीबॅग दिली जात नाही . त्याऐवजी कापडी किंवा सोयीनुसार कागदाच्या पिशव्याच ग्राहकाला घ्याव्या लागतात.

close