उद्या ‘मसाले’दार मेजवानी

April 19, 2012 4:30 PM0 commentsViews: 5

19 एप्रिल

नेहमीप्रमाणे वीकेण्ड जवळ आला आहे आणि या वीकेण्डला 'मसाले'दार सिनेमांनी गर्दी केली आहे. उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्या देऊळला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आता त्यांच्या मसाला सिनेमाबद्दल भरपूर उत्सुकता आहे. मसाला सिनेमा मसाला बनवणार्‍या एका व्यावसायिका भोवती फिरतो. अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी मुख्य भुमिकेत आहेत. याशिवाय श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर आणि मोहन आगाशे यांच्याही भुमिका आहेत. संदेश कुलकर्णीचं पहिलं सिनेमा दिग्दर्शन असलेला हा सिनेमा किती मसालेदार आहे, ते कळेलच. याशिवाय विकी डोनर हा बॉलिवूडचा सिनेमाही रिलीज होतोय. या रोमँटिक कॉमेडी सिनेमाचा निर्माता म्हणून जॉन अब्राहम समोर येत आहे.

close