‘डर्टी पिक्चर’वर कोर्टाची कात्री

April 20, 2012 2:37 PM0 commentsViews: 9

20 एप्रिल

मद्रास क्वीन सील्क स्मितावर आधारीत विद्या बालनचा "द डर्टी पिक्चर" सिनेमा मागिल वर्षी बॉक्स ऑफिसवर 'आग' लावून गेला. आणि आता "द डर्टी पिक्चर" या सिनेमाचे येत्या रविवारी सोनीच्या सेट मॅक्स वाहिनीवर प्रसारण होणार आहे. हे प्रसारण थंाबविण्यात यावं अशी विनंती करणारी जनहित याचिका नागपूरचे प्रविण डहाट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. यावर न्यायालयाने सिनेमातील 56 अश्लील दृश्य वगळावे तसेच अश्लील दृश्य आणि अश्लील संभाषण वगळून हा सिनेमा दाखवावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. जर सिनेमात आक्षेपार्ह्य आढळल्यास सरकाने कारवाई करावी असे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. मुळातच "द डर्टी पिक्चर" प्रदर्शित झाला तो 'A' प्रमाणपत्र घेऊनच एवढं सगळ असतानाही भर दुपारी सोनीने "द डर्टी पिक्चर" घाट रचला. मात्र अखेर न्यायालयाने सोनी टीव्हीला फटकारत तसली 56 दृश्य वगळून दाखवण्यासाठी हिरवा कंदील दिला.

close