पाकमध्ये विमान कोसळले, 127ठार

April 20, 2012 2:57 PM0 commentsViews: 4

20 एप्रिल

पाकिस्तानमध्ये रावळपिंडीजवळ विमान कोसळल्यानं 127 जणांचा मृत्यू झालाय. भोजा एअरलाईन्सचं B4-213 हे विमान कराचीहून इस्लामाबादला निघालं होतं. विमानात एकूण 127 प्रवासी होते. कराचीहून संध्याकाळी पाच वाजता हे विमान निघालं. सहा चाळीसला ते इस्लामाबादला पोचणं अपेक्षित होतं. पण त्याआधीच चकलाला विमानतळाजवळ हे विमान कोसळलं. विमानाला लँडिंगचे निर्देश देण्यात आले होते. पण काही वेळातच कंट्रोल रुमशी त्याचा संपर्क तुटला आणि रावळपिंडीजवळच्या एका नागरी भागात हे विमान कोसळलं. पाकिस्तानी लष्कराने तत्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेतलीय.

close