आयबीएन लोकमत इम्पॅक्ट:भू-माफियांचे ‘महाल’ भूईसपाट

April 20, 2012 5:02 PM0 commentsViews: 5

20 एप्रिल

आयबीएन लोकमतच्या दणक्याने कामतघर येथील झोपड्या पोलीस बंदोबस्तात तोडण्याचं काम सध्या सुरू आहे. कामतघर इथं वनविभागाच्या जागेवर भू-माफियांच्या आशिर्वादाने 400 ते 500 झोपड्यांचे अतिक्रमण करण्यात आल्याची बातमी आयबीएन लोकमतवर दाखवण्यात आली होती. याची दखल घेत वन विभागाने महापालिकेच्या मदतीने आणि पोलीस बंदोबस्ताला घेऊन 150 पेक्षा अधिक झोपड्या तोडण्यात आल्या. मात्र झोपड्या तोडताना स्थानिक रहिवाशांनी ही कारवाई याआधीच का नाही केली असा आक्रोश केला.

close